कुठेतरी ऐकलेले आठवते
तुम्ही कोण आहात? -----
- आपण जेथे राहतो ते घर,
- घर जिथे आहे ते गाव
- ते गाव ज्या शहरात आहे ते शहर
- ते शहर ज्या राज्यात आहे ते राज्य
- ते राज्य ज्या देशात आहे तो भारत देश
- भारत देश आणि असे हजारो देश ज्या खंडावर आहे ते आशिया खंड-
- आशिया खंड आणि उत्तर ध्रुव , दक्षिण ध्रुवा सकट अनेक खंड ज्या पृथ्वीतलावर आहे ती पृथ्वी -
- पृथ्वी जी बुध, मंगल गुरु, शनी आणि इतर ग्रहांबरोबर ज्या आकाशमालेत आहे ती सूर्यमाला,
- असे अनेक सूर्य आणि त्यांचे ग्रह असलेल्या अनेक सूर्यमाला मिळून बनलेली आकाशगंगा
- आणि अस्तित्वात असलेल्या अशा अनंत कोटी कोटी आकाशगंगा
असा व्यापक विचार केला तर आपले अस्तित्व एक पुसटसे बिंदूही नाही.
तरीपण आपले विश्व हे आपल्या परीघापर्यंतच मर्यादित राहते आणि त्या परिघात सामावलेल्या व्यक्ती, दिवसभर ऑफिसात/घरात त्यांची स्क्रिप्टे उतरवण्यात कायम बिझी-बिझी असलेलो आपण.
(whole day we are busy in writing other persons script - he should not have behaved like this, he should have done like that, he is responsible for that, not I ...... )
कधी कधी प्रश्न पडतो------
मी कोण???
कधी वाटते-
थबकले उंबऱ्यात मी, पाहुनी नवी पहाट
जणु जन्मले नव्याने, जडता हा मळवट
हाती संसाराचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका
तर कधी वाटते-
बाबांच्या आयुष्याच्या काही शेवटच्या संध्याकाळी आजारपणात सोबत घालवलेल्या काही रात्री आणि त्याकाळात करता आलेली त्यांची सेवा यातच आयुष्याची धन्यता मानणारी एक भाग्यवान कन्या.
तर कधी वाटते -
जीवापाड प्रेम करणारा जोडीदार आणि लाभलेले अनमोल पुत्ररत्न यांच्याशिवाय दुसरे काहीच न दिसणारी घराच्याच चौकटीत अवघे विश्व सामावलेली आणि त्यातच रमणारी एक सामान्य पतिव्रता(??) - माता(नो ?).
तर कधी वाटते -
आयुष्य एकदाच मिळालेल्या जीवनाचा प्रत्येक क्षण नाविन्य उपभोगण्याची अनावर इच्छया असलेली, कायम मैत्रीच्या विश्वात रमणारी, भिश्या, किट्टी पार्ट्या झोड्णारी, मैत्रीचे अनुबंध जोडणारी-जोपासणारी एक सखी
तर कधी वाटते -
रोजच्या धावपळीत तना च्या स्वस्थतेसाठी शारीरिक व्यायाम , मनाच्या शांततेसाठी मानसिक व्यायाम(मेडीटेशन) यातच relaxation शोधणारी एक जागरूक हेल्थ कॉन्शस आधुनिक स्त्री?
तर कधी वाटते-
स्वत:ला आरशात न बघता, स्वतः कडे बोट न दाखवता दिवसभर इतरांचे मात्र script वर script, script वर script उतरवणारी,
स्वत:च्या आनंदासाठी दुसऱ्यांना बदलवू पाहणारी ,
स्वत: च्या tension ची कारणे स्वत:त न शोधता बाहेर शोधणारी
आणि ही आपली स्वार्थी वृत्ती, पदोपदी जाणवणारी, जगाच्या पदपथावरील एक पामर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा