इकडे आबाच्या ढाब्यात .............अबुधाबीत हं!!!!
(आबाचा ढाबा -पुण्यातले लक्ष्मी रोडवरचे मराठमोळे जेवण मिळणारे हॉटेल तसेच अबू धाबीला, आम्ही दिलेले हे मराठमोळ नाव ) दिवाळीत इकडे पुण्यासारखी मजा नाही आली, न फटाक्यांची आतषबाजी, न घराबाहेर आकाशकांदिलांची डोकावणारी रंगीत रांग. दिवाळी वाटली ती आपल्या घरी आणि सोबतच्या मित्रपरीवारासोबतच. तशी अबू धाबी, दुबई-शारजाच्या मानाने थोडी reserved emirate वाटते. दुबई शारज्यात म्हणे मुंबई पुण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होते. क्वचित इथला राज्यकर्ता थोडा कडक असावा. त्या राजाचे नाव काय माहिती आहे का शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नयान. कितीही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही.
दिवाळीत फराळाचा आनंद मात्र घेता आला कारण थोडाच करावा लागला नं ! कारण ताट देणे-घेणे कमी होते. फटाके वाजवता आले नाही ते एक प्रकारे बरे झाले कारण त्यामुळे होणारे प्रदषण, भाजल्यामुळे काहींना गमवावे लागणारे प्राण, किंवा आलेले अपंगत्व, आणि मुख्य म्हणजे फटके बनवताना फक्त आणि फक्त वापरले जाणारे चिमुकल्यांचे हात, त्यामुळे त्यांना होणारे श्वसनाचे आजार या सगळ्यांचा विचार करता एक प्रकारे बरेच झाले.
तसे इथले वातावरण गरमच. त्यामुळे इथल्या दमट वातावरणात झुरळे ही ओघाने आलीच. झुरळ - नाव जरी तोंडात आलं तरी 'ईआक ' व्हायला होत. इथल्या गरम वातारणात झुरळांची साईझ ही मोठी होत असावी. पण स्वयंपाक घरातली स्त्री आणि झुरळ याचं नातं कितीही नाही म्हटलं तरी कधी-कधी आमने-सामने होतच. झुरळांनाही आपल्यासारखे तेलकट-तुपकट-चमचमीत आवडत असावच. गस ची नळी, ट्रॉली हा तर त्यांचा लपायचं अड्डा. त्यात इमारत प्रकार असल्याने त्यांना एका घरातून दुसऱ्या घरात पाईपमधून त्यांची gang पसरायला वेळ लागत नाही. बायका जितक्या सोशिक, तितक्याच
उंदरा-झुरळांच्या बाबतीत घाबरट. झाडू, चपला, पेपरच्या घड्या असली शस्त्रे वापरून त्यांचा संहार करणं आपल्याला तर कधी जमले नाही . वरतून बायकांची खोचक बोलणी, ' उसने घर में पेस्ट-कंट्रोल किया है इसलीए सब मेरे घर मे घुसे है ! '.
पण प्रत्येक वेळी paste control करणे तसे नेहमीच शक्य होत नाही. पण उपायच नसतो. ठेचून मारले तरी ती लवकर मरत नाहीत म्हणे. तसा प्रयत्न कधी केलाही नाही. त्यांचं डोकं जरी तुटले तरी ते जिवंत राहू शकतात कारण ते तोंडाने, नाकाने श्वास घेत नाहीत असे वाचल्याचे आठवते. लक्ष्मण-रेषा काही मिळाली नाही पण कसलीतरी किटकनाशक पावडर मात्र मिळाली आणि एकदाची त्यांच्यापासून सुटका झाली.
कधीकधी पाईप मधून येणारी मोठी-मोठी झुरळे तर कधी रात्री अचानक उठल्यावर एकामोगोमाग दिसणारी छोटी छोटी झुरळे. आणि मग नकळत आठवते ती शांता शेळकेंची कविता. त्यांना एवढी छान कल्पना कशी सुचली असेल नाही? मुलाला तर ही कविता खूपच आवडते.
झुरळांची कविता ……… ... शांता शेळके
रोज रात्री आमच्या घरात
झुरळांच्या लग्नाची निघते वरात
झुरळांचं बिऱ्हाड खूपच मोठे,
मोठ्यांसंगे निघतात छोटे
तोऱ्यात चालतात विहीणबाई,
मागे बिचारी नवरीची आई
नवरदेवांच्या थरथर मिश्या
मुंडावळ्याच शोभतात जश्या
नवरी नेसते तांबडा शालू,
म्हणते दागिने कुठले घालू
झुरळांची वरात घरभर फिरते
कपाटाखाली अलगद शिरते
झुरळांच्या घरात मेजवानी काय,
थोडेसे खरकटे थोडीशी साय
फ्रिजमधली हवा थंडगार छान
नवरानवरी गाठतात माथेरान छान
झुरळाशी आपलं नातं कितीही कडवट असलं तरी आमने-सामने झालं कि कविता हमखास आठवते आणि हास्याची एक लकेर हलकेच उमट्वून जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा