१७ जुलै, २०१३

चंद्रावरचं आपलं वजन



नुकतीच उन्हाळ्याची जुलै- ऑगस्टची सुट्टी लागलेली.  असाच उन्हाळ्याच्या सुट्टीचा एक दिवस

हर्षल  :मम्मा  आज  काहीतरी चांगलं कर ना ?

मम्मा : शंकरपाळ्या करू ?

चालेल !

पटकन तयारी झाली , शंकरपाळ्या तळणे चालू  पण तोंडात मात्र मोजून  २-३……………….  च जातायेत तेही चव पाहण्यासाठी (कॅलरी  कॉन्शस ????????????)

तूप, साखर, अणि मैदा पण. २०० अधिक १०० अधिक २०० कॅलरीज .......... बाप रे !!!! कधी कधी डायट बद्दलची अधिक माहिती विनाकारण frustration आणते

मनात विचारचक्र चालूच आहे त्याच वेळी हर्षल किचन मध्ये येतो

हर्षल : मम्मा तुझं वजन चंद्रावर किती असेल सांगू ?
मम्मा : किती रे  ?

हर्षल :  फक्त १२. ४१kg    (कारण चंद्राची gravity  आहे  ०.१७)
आणि प्लुटो  वर तुझं वजन किती असेल  सांगू ४ .३ ८ kg (कारण प्लुटोची  gravity आहे  ०.० ६)
…।
……
…….
……….

चंद्राच्या कलेप्रमाणे, दर वर्षी  किलो-किलोने वाढणाऱ्या वजनाची जाणीव नकळत  अस्वस्थ करुन  सोडते

काश !!!!!!! काश !!!!!!! मै  चाँद पे रहती …………………

आपण चंद्रावर किंवा प्लुटो वर राहत असलो असतो तर किती बरं झालं असतं !!!!!!!!!!!!

मनातल्या मनात आपण चंद्रावर आहोत असं स्वत:ला  समजून शंकरपाळ्याची प्लेट केव्हाच रिकामी झाली होती .
 

बाबा


अनंत विश्वातील असलेलं माझं एक छोटंसं  अस्तित्व केवळ आणी केवळ ज्याच्यामुळे  आहे - तो बाबा

इतरांची मदत न घेता  कन्यांची जबाबदारी समर्थपणे पेलणारा -तो बाबा

आचारातून-विचारातून स्वावलंबनाची  शिकवण देणारा - तो बाबा

स्वतः ऑफिसला चालत जावून मुलींना खाऊसाठी चाराणे -आठाणे बाजूला काढून ठेवणारा - तो बाबा

स्वाभिमानानं जगा आणी जगवा  असं शिकवणारा -तो बाबा

चॉकलेट-बर्फी नेहमी  नाही देता तरी आजोळचा कोकणचा मेवा मात्र मनसोक्त खावू घालणारा- तो बाबा

जीवाभावाचा सखा आणि पुत्र ज्यांच्या आशीर्वादामुळे लाभला - तो बाबा

कधीतरी निवांत वेळी आपलं दु:खं  विसरून तबल्यावर बोल वाजवणारा किंवा सतारीवर तार छेडणारा- तो बाबा

अनंतात विलीन झाला   तरी वारंवार   शतश: त्रिवार वंदन करावसं वाटणारा - तो बाबा

आणी हृदयातील  खोल पोकळीचं अस्तित्वही  पदोपदी  जाणवू देणारा - तो फक्त बाबा आणी  बाबाच
...............
...........
........

आज ह्या महिन्यात तुम्हाला अनंतात विलीन होवून एक  वर्ष पूर्ण  होईल. पण ह्या ३६५ दिवसात असा एकही दिवस गेला नसेल कि तुमची आठवण झाली नाही.

आठवण आली कि हृदयाच्या निसरड्या वाटेवर मन हळूच डोकावतं आणि  आसवांची घळघळ आपोआप डोळ्यातून चालू होते  आणि कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबतच नाही. इतकं का खोल असतं  हे प्रत्येक  बाप-लेकीचं  नातं.   मनानं  जोडलेलं  मनातच खोल रुजलेलं.

लग्नांनंतर तर हे नातं  अधिकच भावूक झालं. तुम्ही होतात  तेव्हाही अनावर आठवण यायची, पण आता अस्तित्व संपलं तरी आठवणी काही केल्या संपतच नाहीत. जिवंत  असताना  वाकून नमस्कार करणं कधी जमलं नाही कधी लाजेखातर, तर कधी वाटलं  नाही म्हणून, पण पूर्वीही आणि  आताही  मात्र तुम्हाला शतश: त्रिवार वंदन कायमच मनातून करत राहिले.

तुम्ही असताना हृदयात  एक जागा होती आदराची, प्रेमाची पण गेल्यावर मात्र हृदयात एक मोठी पोकळी निर्माण करून गेलात,........... कधीही न भरून येणारी. या सारखी  दु:खद  भावना यापूर्वी  कधी निर्माण झाली नव्हती. हृदयातील  पोकळीचं  अस्तित्व तुमच्या जाण्यानं जाणवलं अन पावलोपावली जाणवत रहातं.

असं  अचानक निघून जाल असं  कधी वाटलच नव्हतं. तीन महिन्याच्या अवधीत  सगळंच  आटपलं. निमित्त झाले साधं  सर्दी-खोकला, पण पुढे वाढत जावून हॉस्पिटलच्या वा ऱ्या-कफ -लंग्स -किडनी-डायलिसिस सगळं  करुन झालं…………    खूप कंटाळला  होतात  न आयुष्याला. मरणाच्या दाराकडे अगदी खिन्नपणे  टक लावून बसला  होतात.   अन मग एक दिवस सगळंच संपलं  होतं .
…………
……
……


दर वर्षीप्रमाणे शिवरात्रीला,  देवगडला जावून, 'ओम नम: शिवाय' जप ह्या वर्षी करता येणार नाही,  ही  रुखरुख मात्र तुम्हाला शेवटपर्यंत  लागून राहिली होती.
 

२० एप्रि, २०१३

फेसबुक - वेगवेगळ्या नजरेतून

मुझे तो तेरी लत लग गई ........... 
                                             लग गई ......... .....
                                                                  जमाना कहे लत ये गलत लग गई !!!!!!!!!!!



इकडे आबाच्या ढाब्यात (अबू धाबी) आल्यापासून तशी फेसबुकाची सवय झाली.

नकोच , फोटो नकोच लावूया, उगाच कॉपी करून आपल्याच मित्रांना रिक़्वेस्त पाठवतात म्हणे. त्यापेक्षा फोटो रिकामा  ठेवलेला बरा.

अरे बापरे, त्याच्या फोटोला किती लाईक आले. अगदीच फ़ेमस आहे रे तो ! ३ हजार मित्र आहेत त्याचे  फेसबुकवर ? ओ नो !!!

त्यापेक्षा  असं करू का, माझे मित्र इतरांना नको रे दिसायला. उगाचच प्रायवसी जाते.

त्यांचं  काय, बघावं  तेव्हा सारखे नुसते इकडे -तिकडे ट्रिपा  काढत  असतात आणि आले की  टाकतात फोटो फेस्बुकावर. उगाचच फ़्रस्ट्रेशन येतं  ते फोटो बघुन. आमचं कधी फिरायला जाण होतंय देव  जाणे. लाईक तर करूया.

नाहीतरी  दिवसभर घरी काही काम असते का? सारखं उगाच काहीतरी पोस्टत असतात. उगाचच पान  भरून जातात.

फोटो खरच छान  आहे पण  लगेच नको लाईक करायला नाहीतर वाटायचं सारखं फेसबुकवर पडीक असते. नंतर सवडीनं करु.

पण मी म्हणतो,  आपलं  व्यक्तिगत आयुष्य दुसऱ्यांसमोर कशाला उघडं पाडायचं, पर्सनल फोटो नकोच. बाकी काय ते टाकू.

नाही …………… नाही! ……………………… ………………. मी काही त्यातला नाही हं! आमचे फोटो म्हणजे सामाजिक, नैसर्गिक, वैचारिक  असतात कारण आमचा ग्रुप वेगळा आहे ना? आमचं  आपलं वेगळं हं!

ऑफिसातही बघावं तेव्हा स्टाफ निम्मा  वेळ  एफ बी वरच असतो म्हणे.

त्याचं / तिचं स्टेटस सिंगल आहे की कमीटेड कि इंगेज्झ.  रिक्वेस्ट पाठवू का?

माझं नाही रे बाबा तसं, रात्री फक्त एकदा अपडेट्स चेक करतो इतकंच. वेळ कुठे असतो?  एखादा  महत्वाचा निरोप चुकला तर म्हणून आपलं  चेक करतो इतकच.

फेसबुक तर हल्ली चर्च चे फादरच झालेत. कोटेबल कोट्स आणि देवादिकांच्या तसबिरी, हे लाईक करा म्हणजे चांगली खबर ऐकायला मिळेल वगैरे- वगैरे. जनरल नॉलेज मध्ये भर पडते म्हणे.

कोटेबल कोट्स रोज वाचायचा कंटाळा आला तरी त्यातला एखादा आपल्या रोजच्या दिनक्रमात घडलेल्या प्रसंगांशी  मिळता-जुळता  असला कि आपण पटकन लाईक करतो वा  कम्मेंटतो.

काय करू सकाळ झाली की सर्व कामे उरकल्यावर हात आपोआप कम्पुटर कडे वळतात. फक्त पाचच मिनिट करता -करता कधी अर्धा-एक तास निघून जातो ते कळत हि नाही.

मुलाबाळांची मेडलं- प्रशस्तिपत्रक पोस्टताना मात्र आई-वडीलांच्या अंगावर मुठभर मांस अधिक चढतं हे मात्र नक्की.

या वर्चुअल जगाचा एक मोठा फायदा म्हणजे आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी जगातून कुठेही जोडलेले राहतो हे मात्र खरं. पण हे खरच वर्चुअल असतं नाही ? यात फक्त आनंद व्यक्त केला जातो, पण आतला मत्सर, रोजचं दु:ख, टेन्शन, चिडचिड, एकमेकांबद्दलचे हेवेदावे  बाहेर येवू दिले  जात नाही किंबहुना येवू देवू नये हेही नसे थोडके. 

२ मार्च, २०१३

मी ……. आणि माझं वर्तुळ


आपलं  आयुष्य म्हणजे एक वर्तुळ असतं  नाही!!!!



कुणाला  परिघात घ्यायचं ,
कुणाला परिघावरच ठेवायचं
आणि कुणाला अगदी  परिघाच्या बाहेर.… थोडंसं लांब ……….खूप  लांब ……… आपणच ठरवतो.

परीघावरच्या बिंदूंना आत प्रवेश मिळायला थोडा वेळ लागतो खरं, तर कधी काही बिंदू  अजाणतेपणे हळूच शिरकाव करतात
काही बिंदू आपले-आपण न सांगता परिघाबाहेर जाणं पसंत  करतात
पण काही बिंदूंना मात्र कायम परिघावरच राहण्यात समाधान मानावं लागतं.

परिघातल्या बिंदुंनाही केंद्राबिंदुच्या(स्वतः च्या) किती जवळ आणायचं तेही आपणच ठरवतो.
बिंदूंची   अधिक-वजाबाकी करणंही सोपं असतं,
गुणाकार करताना मात्र थोडा वेळ लागतो
पण भागाकार करतांना दुसऱ्याच्या मनाचे किती सारखे तुकडे झाले याचा मात्र कमी विचार करतो.

केंद्रबिंदूपासून वर्तुळातल्या किंवा  वर्तुळा बाहेरच्या प्रत्येक बिंदुला सरळ रेष काढली तर
काही रेषा पुसट दिसतील तर
काही खूपच गडद भासतील.
काही त्रिज्या बनतील तर
काही दोन्ही टोकाला मिळून व्यास बनतील आणि मध्ये मात्र केंद्रबिंदू होरपळत राहील.

पण अशा  आजपर्यंतच्या किती अगणित रेषा तयार झाल्यात  वा होतील
पण केंद्राबिंदुमात्र  एकच राहील- एकच राहील अगदी  शेवटच्या श्वासापर्यंत.

आणि केंद्रबिंदूच नष्ट झाल्यावर बिचारे आतले बिंदू पुन्हा बाहेर पडतील दुसऱ्या  नवीन  केंद्र-बिंदूच्या शोधात . 

२५ फेब्रु, २०१३

फ्रीज - झुरळांचं माथेरान

इकडे  आबाच्या ढाब्यात .............अबुधाबीत हं!!!!
  (आबाचा ढाबा -पुण्यातले लक्ष्मी रोडवरचे मराठमोळे जेवण मिळणारे हॉटेल तसेच अबू धाबीला, आम्ही दिलेले हे मराठमोळ नाव ) दिवाळीत इकडे पुण्यासारखी मजा नाही आली, न फटाक्यांची आतषबाजी, न घराबाहेर आकाशकांदिलांची डोकावणारी रंगीत रांग. दिवाळी वाटली ती आपल्या घरी आणि सोबतच्या मित्रपरीवारासोबतच. तशी अबू धाबी, दुबई-शारजाच्या मानाने थोडी reserved emirate वाटते. दुबई शारज्यात म्हणे मुंबई पुण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होते. क्वचित इथला राज्यकर्ता थोडा कडक असावा. त्या राजाचे नाव काय माहिती आहे का शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नयान. कितीही लक्षात  ठेवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही.

दिवाळीत  फराळाचा आनंद मात्र घेता आला कारण थोडाच करावा लागला नं !  कारण ताट देणे-घेणे कमी होते. फटाके वाजवता आले नाही ते एक प्रकारे बरे झाले कारण त्यामुळे होणारे प्रदषण, भाजल्यामुळे काहींना गमवावे लागणारे प्राण, किंवा आलेले अपंगत्व, आणि मुख्य म्हणजे फटके बनवताना फक्त आणि फक्त वापरले जाणारे चिमुकल्यांचे हात, त्यामुळे त्यांना होणारे श्वसनाचे आजार या सगळ्यांचा विचार करता एक प्रकारे बरेच झाले.   
 
तसे इथले वातावरण गरमच. त्यामुळे इथल्या दमट  वातावरणात झुरळे ही  ओघाने आलीच. झुरळ - नाव जरी तोंडात आलं तरी 'ईआक ' व्हायला होत. इथल्या गरम वातारणात झुरळांची साईझ ही मोठी होत असावी. पण स्वयंपाक घरातली स्त्री आणि झुरळ याचं नातं कितीही नाही म्हटलं तरी कधी-कधी आमने-सामने होतच. झुरळांनाही आपल्यासारखे तेलकट-तुपकट-चमचमीत  आवडत असावच. गस ची नळी, ट्रॉली हा तर  त्यांचा लपायचं अड्डा. त्यात इमारत प्रकार असल्याने त्यांना एका घरातून दुसऱ्या घरात पाईपमधून त्यांची gang पसरायला वेळ लागत नाही. बायका जितक्या सोशिक, तितक्याच 
उंदरा-झुरळांच्या बाबतीत घाबरट. झाडू, चपला, पेपरच्या घड्या असली शस्त्रे वापरून त्यांचा संहार करणं  आपल्याला तर कधी जमले नाही . वरतून बायकांची खोचक बोलणी, ' उसने घर में पेस्ट-कंट्रोल किया है इसलीए  सब मेरे घर मे घुसे है ! '.

पण प्रत्येक वेळी paste control  करणे तसे  नेहमीच शक्य होत नाही. पण उपायच नसतो.  ठेचून मारले तरी ती लवकर मरत नाहीत म्हणे.  तसा प्रयत्न कधी केलाही नाही. त्यांचं  डोकं जरी तुटले तरी ते जिवंत राहू शकतात कारण ते तोंडाने, नाकाने श्वास घेत नाहीत असे वाचल्याचे आठवते. लक्ष्मण-रेषा काही मिळाली नाही पण कसलीतरी किटकनाशक  पावडर मात्र मिळाली आणि एकदाची त्यांच्यापासून सुटका झाली. 

कधीकधी पाईप मधून येणारी मोठी-मोठी झुरळे तर कधी रात्री अचानक  उठल्यावर एकामोगोमाग दिसणारी  छोटी छोटी झुरळे. आणि मग नकळत   आठवते ती शांता  शेळकेंची कविता.  त्यांना एवढी छान कल्पना कशी सुचली असेल नाही? मुलाला तर ही  कविता खूपच आवडते.  


झुरळांची कविता               ………  ... शांता शेळके

रोज रात्री आमच्या घरात
झुरळांच्या लग्नाची निघते वरात

झुरळांचं बिऱ्हाड खूपच मोठे,
मोठ्यांसंगे निघतात छोटे

तोऱ्यात चालतात विहीणबाई,
मागे बिचारी नवरीची आई

नवरदेवांच्या थरथर मिश्या
मुंडावळ्याच शोभतात जश्या

नवरी नेसते तांबडा शालू,
म्हणते दागिने कुठले घालू

झुरळांची वरात घरभर फिरते
कपाटाखाली अलगद शिरते

झुरळांच्या घरात मेजवानी काय,
थोडेसे खरकटे थोडीशी साय

फ्रिजमधली हवा थंडगार छान
नवरानवरी गाठतात माथेरान छान


झुरळाशी आपलं नातं कितीही कडवट असलं  तरी  आमने-सामने झालं कि  कविता  हमखास आठवते आणि  हास्याची एक लकेर हलकेच उमट्वून  जाते. 

१६ जाने, २०१३

हाँ आखिर हमने जीना सिख लिया

 

पलट के देखती हु तो जिंदगी के पन्ने
१० पन्ने   चलते चलते स्कुल के दप्तर(bag) का बोज कभी बोज नहीं लगा
20 पन्ने  तक कालेज-करीअर  में पता ही नहीं चला
30 वे पन्ने  तक दिलका दिल से मिलन हुआ और कब  साथ-साथ  चल पड़े पता ही नहीं चला
40 वे पन्ने  तक पहुँचते-पहुँचते जिगर का टुकड़ा   बड़ा होने लगा और कहने लगा 'माँ ये आपके लिए', भर आती  है ऑंखे उसे  देखकर
हाँ,   फिरभी  हमने तो जिना  कब का ही  सिख  लिया उन अपनों के संग

पलट के देखती हु जिंदगी के पन्ने
मेरी  कुछ यादें आप सबके  पास पड़ी है
आपने आपके जिन्दगीके दिए हुए लम्हे  अभी भी याद  है और याद रखना चाहती हूँ 
उन लम्हों को पीछे  छोड़कर कबकी आगे आ  गई है जिंदगी
हाँ फिरभी हमने तो  जीना  सिख ही लिया ना  उन यांदो के  संग

पलट के देखती हु जिंदगी के पन्ने
कभी गहरी धुप थी, कभी हल्किसी छाव थी
कभी समुन्दरकी  लहरों ने  अपने आपमें समाना चाहा  तो कही लहरे किनारेसे ही वापस चल दी
मत्सर को, प्रेम को , ईगो  को, जेलसी को अपने ही फ़िल्टर से दुसरोंको देखना चाहा
उनका नजरिया कभी समज़ ही न पाई
हाँ फिर भी तो हमने जीना सिख लिया ना  उन  के अटूट  विश्वास के संग

रुक के देखती हूँ
तो लगता है जिंदगी में चाहिए वो  मिला फिर भी क्यों लगता है उन्हें खोने का डर
कभी माँ -बाप को खोने का डर
कभी अपनों को खोनेका डर
कभी अपने आप को खोने का डर
हाँ फिरभी हमने तो जीना सिख ही लिया ना उस डर के संग

फिरभी , क्यू  ऐसा लगता  है
लगता है  के,    .......................  लगता है के  ........................

जिंदगी................. थम सी  जाये  इस मोडपर!!!!!!
                                                    

 

५ जाने, २०१३

नूतन वर्षाच्या उंबरठ्यावर - नात्यातलं टेंशन


 

नवीन वर्ष सुरु झाले नाही का? संकल्प करायचा राहूनच गेला की ? सरत्या वर्षात  आयुष्यात कित्येक गोष्टी घडल्या. म्हणता-म्हणता आता परदेशात  स्थिरावता वर्षही होत आले. . विमानप्रवास हि सारखा घडला. दुबई फिरताना    TOP   OF  THE WORLD  फिरता आलं.  वडिलांचे छत्र नाहीसे झाले आणि आयुष्यात दु:खद , कधीही न भरून निघणारी एक पोकळी  निर्माण झाली .
प्रत्येक टप्प्यावर  नवीन जुळणारी नाती आणि त्यांना जाणून घेताना आपणही एकप्रकारे सज्ञान होत असतो नाही?   माणसाचं  अस्तित्व जगात सारखच जाणवतं.   मानवी प्रश्न मुल्यान्प्रमाणे, लिंगाप्रमाणे, किंवा भौगोलिकदृष्ट्या काही बदलत नाहीत. ते सारखेच राहतात. जन्माची, वाढण्याची आणि मरणाची प्रोसेस  सगळीकडे सारखीच असते. तसेच आनंद  आणि दुखं ही सगळीकडे सगळ्यांना एकसारखीच असतात. रोजच्या आयुष्यात टेन्शन हे तर अटळच.

कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे येणारं टेंशन, काही केल्या त्यातून बाहेर येणे खूप अवघड होऊन जाते.
 गोष्ट कितीही क्षुल्लक वाटली तरीही मनातून विचार काही केल्या जात नाही.
सहवासातल्या व्यक्तींमुळे, आप्तांमुळे येणारं टेंशन.   असं ती/तो कशी वागू शकते? मी तर अशी वागली नव्हते ? मग तीनेच का बरं असं वागावं ? मी किती जमवून घेणाचा प्रयत्न केला पण व्यर्थ. ती/तो तशीच आहे. यापलीकडे मी काही करू शकत नाही. तिनेच मला समजून घ्यायला पाहिजे. नको त्यापेक्षा मी लांबच कशी राहते मग न जमण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आमचे आम्ही बरे. तुमचे तुम्ही बरे. मेंदू ठरवतं कि अग positive विचार कर , sportingly घे. विसरायचं प्रयत्न कर, मनातून काढून टाक, पण नाहीच.
 
 
बापरे! काय हे मन? कसं  समजावू त्याला?  आटोकाट प्रयत्न केला पण छे. किती हा नात्यांमधला  ताण!
 
कधी इतरांचे मन जपण्यासाठी मनात नसतानाही कराव्या लागणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर  कधी केवळ आपण आनंदी असल्याचा देखावा करून समोर कराव्या लागणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर कधी वाढत्या वयाप्रमाणे सहन न होणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर कधी जोडलेल्या नात्यांसाठी करावी लागणारी तडजोडी मुळे येणारा ताण, तर कधी केलेल्या उपकारांची जाणतेपणे जाण ठेवण्यासाठी चाललेली धडपडी मुळे नकळत येणारा ताण , तर कधी केवळ मनात आले म्हणून कराव्या लागणाऱ्या कृती आणि त्यातून मिळणारे समाधान पण तरीही जाणवणारा ताण, कुठली कृती श्रेष्ठ आणि कुठली अश्रेष्ठ,  कुठलं चूक आणि कुठल बरोबर यात चाललेली मनाची घालमेल आणि त्यामुळे येणारा ताण.
 
हा ताण कायम कुठल्यातरी नात्याशी व स्व:ताशी  जोडलेला असतो. कर्मधर्म संयोगानं जुळलेलं नाते टिकवण्यासाठी कधी दुरूनच हाय आणि बाय एवढंच बरं वाटत असतं, कधी नात्यात मोकळेपणा  नसला तरी मनातून प्रचंड आदर असलेले आदराचं नातं टिकवावसं वाटतं, तर कधी केवळ जुन्या मैत्रीखातर तिचं असंबद्ध बडबड ऐकूनही जपावं वाटणारं मैत्रीचं नातं, तर कधी गोष्टी पटत नसतानाही न सोडावसं वाटणारं वा न सोडता येणारं बांधलेले आप्तस्वकीयाचं   नातं,  तर कधी एखाद्या दिवशी अगदी जीवापलीकडचे वाटणारं नातं दुसऱ्या दिवशी विनाकारण फिकं-फिकं वाटणारं मैत्रीचं  नातं, आपल्या सहवासात असताना जीव लावणारी, पण स्वतःच्या कुटुंबात गेल्यावर मी तुझी कोणी नाही असा भासवणारी छोट्या मुलांची नातीही अनपेक्षित धक्का देतात.
       

प्रत्येक वेळी कितीही ठरवलं मनानं ठरवलं तरीही मनाला खुपलेली  एखादी  गोष्ट काढून टाकणं  खूपच अवघड होऊन जातं. कधी एक दिवस तर कधी कित्येक दिवस, तर कधी कित्येक महिने-वर्षे  त्या खुपलेल्या  गोष्टीचं भुणभुण मनात राहतं.
कितीही विचार केला कि इतरांबद्दल racket (racket म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सारखी चालू असलेली कम्प्लेन मग ती कधी स्वतः बद्दल असते किव्हा इतरांचीही असते) चालवायचे नाही तरी त्यातून बाहेर येणे किती अवघड वाटतं नाही? केवळ अपेक्षा हेच कारण असावं म्हणून त्याबरोबर येणारं अपेक्षाभंगाच दुखःही सहन होत नसावं. मीपणा प्रत्येक वेळी आडवा येतो. मन हे meaning making machineआहे हे माहित असूनही आपल्या विचारा प्रमाणे अर्थ लावण्यात मनाला  एक वेगळच समाधान  मिळत असतं. मनातल्या  little voice  ची भुणभुण सारखी चालू राहते.  आयुष्य stuck झाल्यासारखे, जखडल्यासारखे वाटते.

पूर्वी अगदी छोटी-छोटी कामेही करताना एक प्रकारचा उत्साह असायचा, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद वाटायचा. सगळी कामं  आरामात न कंटाळता केली जायची, पण मग हल्ली असा का होतं बरं? छोट्या-छोट्या गोष्टी सहन होत नाही, स्ट्रेस लेवेल वाढते, चिडचिड होते, आपल्याच मुद्यांवर ठाम राहावंसं वाटतं, stubburn व्हायला होतं. असं परत होऊ द्यायचं नाही असं मनात ठरवूनही परत तसच घडत राहतं आणि अचानक सरत्या वर्षाची शेवटची संध्याकाळ समोर उभी ठाकते आणि मग विचार करू लागते या वर्षी घडलेल्या घटनांचा मागोवा  घेऊ लागते. हे वर्ष चांगलं  होतं  कि वाईट. या वर्षी नाती दुरावली कि जोडली गेली?
नव्या नाती जुळवताना त्यात नवलाई असल्यामुळे नातेसंबंध वाढवण्याचा उत्साह वाढलेला असतो, तर जुन्या नात्यांमधली जवळीक तितकीशी वाढलेली नसते किंवा काही नाती दुरावलेलीही असतात.
सहवासातत्या प्रत्येक चांगल्या-वाईट व्यक्तींमध्ये नक्कीच असे सद्गुण सापडतात जी ज्याचा लवलेशही आपल्याकडे कधीकधी सापडत नाही. मग काही गुणांकडे दुर्लक्ष केले तर नात्यात कधी दुरावा भासणार नाही हेही मनाला पटू लागते.
 मग कुठेतरी शिकल्याचं आठवतं. गांधीजींनी आधी  declare  केले कि 'चले जाव ' हे सगळे  पुढे कसे होणार, काय घडणार  हे त्यांनाही माहित नव्हते. पण possibilities  आपोआप उघडत गेल्या actions  आपोआप घडत  गेल्या  आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे आपण आपल्या आयुष्यात नक्कीच वापरू शकतो.

DECLARE by  words  ----> POSSIBILITIES automatically open


 नवीन वर्षाचे resolution नव्या जोमानं लिहून काढायचे ठरवते.  त्यात हा एक संकल्प कि होऊ वाटणाऱ्या गोष्टी आधी शब्दाने declare  करायच्या, समोरचे दरवाजे आपोआप उघडतील.

नवी नाती फुलवताना जुन्या नात्यांमधील ओरखडे पुसण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. काळाने दुरावलेल्या, कधी विसरलेल्या, तर काही जाणीवपूर्वक दूर सारलेल्या नात्यांमध्ये एक नवीन पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करेन हा हि  अनेक संकल्पापैकी एक संकल्प .